काटा मारणाऱ्या कारखानदाराचा सुज्ञ पदवीधर काटा काढतील ; श्रीमंत कोकाटे


कोल्हापूर येथे आयोजित भव्य पदवीधर मेळाव्यात बोलताना पुणे पदवीधरचे अपक्ष उमेदवार डॉ. श्रीमंत कोकाटे यावेळी कोल्हापूर शहर परिसरातील अनेक पदवीधर उपस्थित होते. या मेळाव्याचे अध्यक्ष स्थान संभाजी ब्रिगेड चे प्रदेश अध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड यांनी भूषविले. 
(Advertise)

प्रस्तावित संभाजी ब्रिगेड चे प्रदेश कार्याध्यक्ष हिंदुराव हुजरे पाटील यांनी केले.यावेळी बोलताना पाटील म्हणाले, ही लढाई भांडवलदार विरुद्ध आहे आणि ही लढाई आम्ही नक्की जिंकू असे पाटील म्हणाले.  

यावेळी बोलताना लोकप्रिय उमेदवार डॉ. श्रीमंत कोकाटे  म्हणाले, की आपली लढाई ही सनातनी आणि प्रतिगामी शक्तींशी आहे. खरी लढाई ही फक्त RSS आणि भाजपच्या विरोधात आहे . ही निवडणूक ही स्वाभिमानी पदवीधर विरुद्ध २ साखर कारखानदार अशी आहे. आणि स्वाभिमानी मतदार २ कारखानदारांना पडतील याची मला खात्री आहे. काटा मारणाऱ्यांचा काटा पदवीधर नक्की काढतील यात शंका नाही

Post a Comment

0 Comments