"गुगल पे" वापरकर्त्यांना धक्का, मोफत सेवा होणार बंद


गुगल पेेच आता पैसे ट्रान्सफर मोफत असणार नाहीय. बॅंक टू बॅंक पैसे ट्रान्सफर करण्यासाठी फीस आकारली जाणार आहे. कंपनीने यासाठी तयारी सुरु केली आहे. टेक साईड बिझनेस इनसाइडर यांनी यासंदर्भात माहिती दिली. 
(Advertise)

जानेवारी २०२१ पासून पीयर टू पीयर पेमेंट सुविधा गुगल पेतर्फे बंद केली जाणार आहे. यासोबतच कंपनीतर्फे इस्टेट मनी ट्रान्सफर पेमेंट सिस्टिम जोडली जाणार आहे. यानंतर युजर्सला मनी ट्रान्सफर करण्यासाठी शुल्क द्यावे लागणार आहे. यासाठी किती चार्ज घेतला जाणार ? हे अद्याप कंपनीने स्पष्ट केले नाही.
(Advertise)

गुगल वेब एप होणार बंद 
सध्या गुगल पे युजर्स मोबाईल एप किंवा वेब एपच्या माध्यमातून आपली सुविधा देतात. कंपनीने आपले वेब एप बंद करण्याची घोषणा केलीय. आता पैसे ट्रान्सफर करण्यासाठी  pay.google.com चा वापर करता येणार नाही. मनी ट्रान्सफर करण्यासाठी आता केवळ Google Pay एपचा वापर होऊ शकणार आहे. 
(Advertise)

गुगल पेचे सपोर्ट पेज जानेवारीपासून बंद केले जाणार आहे. बॅंक अकाऊंटमधून पैसे पाठवताना एक ते तीन दिवस लागतात. तर डेबिट कार्डने ते तात्काळ ट्रान्सफर होतात. 

Post a Comment

0 Comments