“सुप्रिया सुळे मुख्यमंत्री व्हाव्यात, या स्वप्नाच्या आशेने पवारांनी भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय बदलला”


विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला पाठिंबा देण्याची तयारी दर्शविली होती. मात्र ऐनवेळी शरद पवार यांनी निर्णय बदलून शिवसेना आणि काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचा दावा ‘पॉवर ट्रेडिंग’ या पुस्तकात करण्यात आला आहे, यावेळी बोलताना त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.

सुप्रिया सुळे यांना महाराष्ट्राच्या पहिला महिला मुख्यमंत्री करण्याचं शरद पवार यांचं स्वप्न आहे. राज्यातील महाविकासआघाडी सरकार टिकलं तर आपले हे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता आहे, याची जाणीव शरद पवार यांना झाली. त्यामुळेच शरद पवार यांनी ऐनवेळी भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय बदलला, असं लेखिका प्रियम गांधी यांनी सांगितलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने सुरुवातीला भाजपला पाठिंबा देण्याचं ठरवलं होतं. त्यासाठी राष्ट्रवादीतील एका माजी केंद्रीय नेत्याच्या माध्यमातून भाजपशी बोलणी सुरु होती, असंही प्रियम गांधी यांनी सांगितलंय.

Post a Comment

0 Comments