"महावितरण वीज कंपनीने दिवसा कृषिपंपांना लाईट पुरवावी" - दशरथ अण्णा कांबळे


महाराष्ट्र महावितरण वीज कंपनीने दिवसा कृषिपंपांना लाईट पुरवावी अशी मागणी शेतकरी कामगार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष दशरथ अण्णा कांबळे यांनी केली आहे, महाराष्ट्र मध्ये वीज महावितरण कंपनीने रात्रीच्या अकरा लाईट कृषिपंपांना सोडली जाते.

(Advertise)

रात्रीची लाईट असल्यामुळे शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पुलुस गावामध्ये तीन ईवक भावंडांचा लाईटचा शॉक बसून मृत्यू झाला. या मृत्यूला जबाबदार महावितरण कंपनीचा गलत कारभार आहे, रात्रीची कृषिपंपांना लाईट सोडल्यामुळे शेतकऱ्यांना सर्पदंश वन्य प्राण्यांपासून हल्ला होतो. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी जीव गमवावा लागलेला आहे, त्यामुळे ऊर्जा मंत्र्यांनी कृषी पंपांना लाईट दिवसा सोडावी, न सोडल्यास शेतकरी कामगार संघर्ष समितीच्या वतीने महाराष्ट्रामध्ये तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा दशरथ कांबळे यांनी दिला.

(Advertise)

 या बैठकीला अण्णासाहेब सुपनवर, अनिल तेली, विठ्ठलराव शिंदे, भीमराव हनुमंत राऊत, प्रकाश काळे, निलेश पडोळे, बाळासाहेब माने, सुनील खारे, संपत गव्हाणे, समाधान मारकड, वैजनाथ तरंगे, दादासाहेब देवकते, गणेश ईवरे, चत्रभुज इरकर, चागदेव ईवरे, भालचंद्र ईवरे, सोपान पवार, कैलास पवार, आप्पा भोसले आदीजण उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments