करमाळ्यात युवा एकलव्य प्रतिष्ठाणच्या क्रिकेट स्पर्धा; चषकासह २१ हजाराचे प्रथम बक्षीस!


करमाळा/प्रतिनिधी:

करमाळा येथील युवा एकलव्य प्रतिष्ठाणच्या  वतीने हाफ पिच टेनिस बॉल एकलव्य चषक २०२० क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर स्पर्धा २८ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर दरम्यान करमाळा शहरातील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या मैदानावर पार पडणार आहेत. स्पर्धेची वेळ दररोज सकाळी नऊ ते सायंकाळी साडे पाच राहणार असून स्पर्धेच्या नाव नोंदणीसाठी ३० नोव्हेंबरच्या ५ वाजेपर्यंत संपर्क साधण्याचे आवाहन युवा एकलव्य प्रतिष्ठाणकडून करण्यात आले आहे.

स्पर्धेसाठी प्रवेश फी ९९९  रुपये असणार आहे. तर स्पर्धेतील पहिली चार बक्षीसे अनुक्रमे २१ हजार २१ रुपये (युवा एकलव्य प्रतिष्ठाण), १५ हजार १५ रुपये (अमीर भैय्या तांबोळी, युवा नेते), ११ हजार ११ (ऑर्ट्स करमाळा स्मार्ट सिटी), ७  हजार ७ रुपये (संतोष वारे, राष्ट्रवादी काँग्रेस, तालुकाध्यक्ष) अशी असणार आहेत. याशिवाय यशकल्याणी ग्रामीण सेवाभावी संस्थेच्या वतीने चषक दिले जाणार आहेत. अशी माहिती संयोजकांनी दिली आहे.

दरम्यान स्पर्धेत उत्कृष्ट खेळाडूंना विविध वैयक्तिक पारितोषिकांचेही वितरण केले जाणार आहे. अधिक माहितीसाठी ९४०३४९३५१० /९८८१६७२२२१ / ७८८८१५१९४२ / ८६०५०४७६०१ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments