"जास्त अंगावर आलात तर हात धुवून मागे लागेन”; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं विरोधकांना प्रत्युत्तर


 महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलुख सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतली आहे. मुख्यमंत्र्यांची ही मुलाखत उद्या म्हणजेच शुक्रवारी प्रदर्शित करण्यात येणार आहे.
(Advertise)

दरम्यान संजय राऊत यांनी या मुलाखतीचा प्रोमो ट्विटरवरून शेअर केलाय. यावेळी ट्विटरवर त्यांनी उद्या धमाका होणार असल्याचं देखील म्हटलंय.
(Advertise)

विरोधकांकडून मुख्यमंत्र्यांवर सातत्याने टीका होताना दिसतेय. मुख्यमंत्री हात धुवा इतकंच सांगत असतात, अशी टीका करणाऱ्या विरोधकांना मात्र मुख्यमंत्र्यांनी चांगलंच प्रत्युत्तर दिलंय. “हात धुतो आहे. जास्त अंगावर आलात तर हात धुवून मागे लागेन”, असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

Post a Comment

0 Comments