सुर्डी गावांत महिलेवर बळजबरी ; बार्शी तालुक्यात खळबळ


बार्शी/प्रतिनिधी:

नातेवाईकांकडे वास्तव्यास असलेल्या एका महिलेवर दुष्कर्म केल्याप्रकरणी भारत कटाळ पाटील उर्फ भारत बाळू शेळके  रा. सुर्डी याच्यावर दुष्कर्म व अट्रोसिटी अन्वये तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. दि २५ रोजी सुर्डी येथे ही घटना घडली. 

(Advertise)

पीडितेचे आईवडील मयत झाले असून बहीण तिचा सांभाळ करते. सांभाळ करणाऱ्या बहिणीच्या मुलीचा मुलगा १५ दिवसापूर्वी कामानिमित्ताने गेल्याने तिच्या घरी शेळ्या कोंबड्या व घरावर लक्ष ठेवण्यासाठी पीडिता बहिणीच्या मुलीच्या घरी गेली होती. सदरचे काम करत ती घरी एकटीच राहत होती. आरोपी हा तेथे तिच्या मामासोबत शेळ्या घेवून चारण्यासाठी येत जात होता. तो घरी गेल्यावर पीडितेशी बोलत असे. यातून त्यांची ओळख होती.
(Advertise)

दि २५ रोजी पीडितेची मामी वैरागला दवाखान्यात गेली होती व  मामा शेळ्या चरण्यासाठी घेवून गेले होते. सकाळी १०.३० वाजण्यास सुमारास पीडिता घरी एकटीच असताना आरोपीने पाणी पिण्याच्या बहाण्याने घरी जावून पीडितेवर बळजबरीने दुष्कर्म केले व कोणास सांगु नको अशी धमकी देऊन निघुन गेला अशा आशयाची फिर्याद दिली आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments