भाजपाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर बडा नेता राष्ट्रवादीत जाणार


काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधल्यानंतर आता भाजपाला सोडचिठ्ठी देणारे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार जयसिंगराव गायकवाड हे आता राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे वृत्त आहे.
(Advertise)

जयसिंगराव गायकवाड हे  मुंबईत शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. 
(Advertise)

गायकवाड सध्या भाजपच्या प्रदेश कार्यसमितीचे सदस्य होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ते सक्रिय राजकारणातून बाजूला फेकले गेले होते. आता होऊ घातलेल्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपकडून शिरीष बोराळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 
(Advertise)

यामुळे नाराज जयसिंगराव गायकवाड यांनी मराठवाडा विभागातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आज अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असताना त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. मात्र, त्यासोबतच भाजपाला रामरामही ठोकला. दरम्यान, महाविकास आघाडीमुळे ही निवडणूक भाजपला अवघड जाण्याची शक्यता आहे.
(Advertise)

जयसिंगराव गायकवाड हे भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन आणि गोपिनाथ मुंडे यांचे निकटवर्तीय होते. मराठवाड्यात भाजपच्या विस्तारासाठी त्यांनी मोठे काम केले आहे. मध्यंतरी पंकजा मुंडे यांचे नाराजी नाट्य घडले. तेव्हा, गोपिनाथ मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जात असतानाही जयसिंगराव यांनी कुठल्याही प्रकारची भूमिका घेतली नव्हती. 

Post a Comment

0 Comments