"जयंतराव फुकटात मिळालय ते जरा व्यवस्थित हजाम करून घ्या" - चंद्रकांत पाटील


भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. आम्ही एक प्रखर विरोधी पक्ष म्हणून आमची भूमिका बजावतच आहोत. त्यामुळे जयंतरावांनी आमची काळजी करण्याचं कारण नाही. 
(Advertise)

फुकटातलं मिळालंय ते जरा व्यवस्थित हजम करून घ्या. आमची चिंता करू नका. फुकटातं मिळालेलं अधिकाधिक दिवस कसं राहील यासाठी दिवसरात्र मेहनत घ्या, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे. ते पश्चिम महाराष्ट्र भाजप पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते.
(Advertise)
तत्पूर्वी, पुढील चार वर्षं आम्हीच सत्तेवर राहणार. आमदारांनी पक्ष सोडू नये, म्हणून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सरकार लवकरच पडणार असल्याचे बोलावे लागत आहे, असे जयंत पाटील यांनी म्हटले होते. यावरून चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला.

Post a Comment

0 Comments