"भगवंत जांभळे यांचा 'कोव्हीड योद्धा' म्हणून गौरव "

प्रा.डॉ.प्रभाकर माने/शिरोळ तालुका प्रमुख प्रतिनिधी

 महाराष्ट्र नवनिर्माण सेना,इचलकरंजी शहर व विधानसभा कार्यक्षेत्र यांच्या संयुक्तपणे कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर कोव्हीड योद्धा म्हणून कार्य केलेल्या काही निवडक लोकांना गौरविण्यात आले.त्यापैकी  भगवंत दादा जांभळे यांनी टाळेबंदी (लॉक डाऊन) च्या काळात देशात अत्यंत भीतीदायक परिस्थिती निर्माण झाली असताना व अत्यंत गरीब लोकांचे जीवन जगणे मुश्किल होत असताना या दरम्यान एका देवदूता प्रमाणे अत्यंत गरीब व हातावरचे पोट असणाऱ्यां कुटुंबातील वय वर्ष १ते १० या वयोगटातील सुमारे २०० मुलांना एकवेळचे पोटभर २०० मिली हळदीचे दूध,केळी, शिरा,पोहे व भाताची खिचडी देण्याचे सामाजिक कार्य केले.त्यांच्या कार्याची दखल घेत भगवंतदादा जांभळे(मनसे ,कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष) यांनी माणुसकीच्या नात्याने व निस्वार्थी भावनेने  कार्य  केल्याबद्दल 'कोव्हीड योध्दा' म्हणून मनसेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष, गजाननराव (आण्णा) जाधव व संतोष चव्हाण ( विद्यमान उपनगराध्यक्ष,वडगांव व मनसे वडगांव शहराध्यक्ष यांच्या हस्ते गौरविण्यात आले. 
       (Advertise)

भगवानदादा जांभळे यांनी गौरवा प्रसंगी 'आपण प्रत्येक वेळेस  ज्या पक्षाचे  कार्य करत असतो त्या पक्षाच्या  एकनिष्ठ कार्याबरोबरच  'माणूसपण' जपणे  हे आपले आद्य कर्तव्य आहे. आपण सर्वांनी अशा प्रकारचं कार्य करत रहावे अशी अपेक्षा व्यक्त केली.  
            (Advertise

यावेळी जिल्हा सचिव यतीन होरने,इचलकरंजी विधानसभा जिल्हा उपाध्यक्ष रवी गोंदकर,इचलकरंजी शहराध्यक्ष प्रतापराव पाटील,सहकार सेनेचे जिल्हाध्यक्ष मनोहर जोशी,जिल्हा उपाध्यक्ष सुनील हजारे,वाहतूक सेनेचे जिल्हा संघटक संजय भंडारे,शिरोळ तालुकाध्यक्ष गजानन जाधव-दत्तवाडकर,पन्हाळा तालुकाध्यक्ष विशाल मोरे,जयसिंगपुर शहराध्यक्ष निलेश भिसे,उपाध्यक्ष अमित पाटील आदींसह महाराष्ट्र सैनिक मोठया संख्येनेउपस्थित होते.

Post a Comment

0 Comments