"इचलकरंजी शहरात रॉयल फ्रेंड्स क्लबचा रॉयल उपक्रम"

प्रा.डॉ.प्रभाकर माने / शिरोळ तालुका प्रमुख प्रतिनिधी:

इचलकरंजी शहरातील बुलेट प्रेमींचा रॉयल फ्रेंड्स  हा फिरस्ती ग्रुप तयार झाला. सुरुवातीला या ग्रुपचा हेतू बुलेट वरून भारत भ्रमण करणे हा होता. त्यानुसार त्यांनी भारतातील अनेक शहरे  बुलेटवरून धुंडाळून काढली. आता या रॉयल वागणुकीला ग्रुपने रॉयल विचारांची जोड देत सामाजिक उपक्रम करायचे ठरवले. 
      
(Advertise)

सुरुवातीला गतवर्षी प्रथम वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिरातून जवळपास ४० गरजू रुग्णांना मोफत रक्त पुरवठा केला.  त्यातून प्रेरित होवून या  रॉयल मंडळीनी ग्रुपचा दुसरा वर्धापन दिनाचे औचित्य साधून सामाजिक विचार व कृतीने  बेभान झालेल्या या  ग्रुपने रक्तदान शिबिर आयोजन करून रक्तदानचे श्रेष्ठ काम केले.
     
(Advertise)

जेव्हा हे रॉयल मंडळी बाईक रायडिंग करीत ज्याभागात जात असतात. त्या परिसरातील आर्थिक मागास विद्यार्थ्यांना निस्वार्थी भावनेने वह्या व इतर शालोपयोगी वस्तूंचे मोफत  वाटप करीत असत. सर्वात महत्त्वाचं व कौतुकास्पद बाब अशी की, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन मध्ये या ग्रुपने आदिवासी भागात सॅनिटायझर व मास्कचे वाटप केले  आहे. खरंच यांची राईड म्हणजे हेल्प वाली राईड म्हंटले तरी वावगे ठरणार नाही.इथून पुढेही नवनवीन उपक्रम करण्याचा मानस या ग्रुपने व्यक्त केला आहे.अशा या ग्रुपचे अनोख्या कृतीशील कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.रॉयल ग्रुप मध्ये सतीश पंडित सुरेश कराळे, जितेश हंकारे,किशोर सावंत,आप्पासो कुंभोज, सचिन पाटील,अभिजीत कोले, सिद्धू अण्णा पुजारी,जिनेंद्र खंजिरे,हरिभाऊ कुंभार,संजय माने,महेश माळी,अजिंक्य मगदूम,लोटके सर व मोहिते सर हे सदस्य सहभागी आहेत.

Post a Comment

0 Comments