"लोकवार्ता न्युज पोर्टल व जयसिंगपूर कॉलेज राष्ट्रीय सेवा योजनाच्या वतीने रक्तदान व प्लाझमा दान करण्याचे नम्र आवाहन"

प्रा.डॉ.प्रभाकर माने/ शिरोळ तालुका प्रमुख प्रतिनिधी

लोकवार्ता डिजिटल न्यूज पोर्टलचे संपादक अर्जुन गोडगे व जयसिंगपूर कॉलेज,जयसिंगपूर राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. प्रभाकर माने यांच्याकडून रक्तदान व प्लाजमा दान करण्याचे नम्र आवाहन लोकांना करण्यात आले.
     (Advertise)

मार्च २०२० पासून ते आजतागायत कोरोना महामारीचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे देशातील प्रत्येक घटकांना अनेक वाईट प्रसंगाना व प्रश्नांना सामोरे जावे लागले आहे. या  महामारीमुळे अर्थव्यवस्थेचे अक्षरक्षा: कंबरडे मोडले आहे त्याचा प्रत्यक्ष नकारात्मक परिणाम लोकांच्या आर्थिक व आरोग्यावर प्रकर्षाने झालेला आहे. प्रसंग असा की,'बचेंगे तो और भी लढेंगे' या म्हणीप्रमाणे जगणं खूप महत्त्वाचे असून मरण स्वस्त झाले आहे. त्याचे कारण ही असे आहे की, कोरोनाच्या काळात कोरोना पॉझिटिव्ह असणाऱ्या रुग्णांची संख्या प्रचंड होती. 
(Advertise)

त्याचबरोबर कोरोना रुग्णा शिवाय इतर आजारांसाठी किंवा शस्त्रक्रिया वेळी रुग्णांना आवश्यक असणारा प्लाझमा व रक्तदान  महत्त्वाचे घटक असून त्याची कमतरता भासत होती. परंतु एका सामाजिक सर्वेक्षणातून प्राप्त झालेल्या माहितीनुसार,कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे  मार्च महिन्यापासून रक्तदान व प्लाझमा दान करणाऱ्या दात्यांनी पाठ फिरवल्यामुळे आवश्यक असणारे रक्त व प्लाझमाचे संकलन मागणीपेक्षा अत्यंत कमी झाले आहे.त्याचा परिणाम म्हणून रक्त व प्लाझमा अभावी रुग्णांच्या मृत्यू संख्येत सातत्याने वाढ होत आहे. यापुढे सरकार व रुग्णांचे नातेवाईक हतबल झाले असून आपल्यासारख्या मानवता व करुणाचे दर्शन घडविणाऱ्या लोकांनी  हळहळ व्यक्त करण्यापेक्षा रक्त व प्लाझमा दान करून  आपल्या देशवासीयांना जीवदान देऊन सत्कार्य करावे.अशी विनंती वजा आव्हान करण्यात आले.
   
यासाठी उपाय म्हणून वैयक्तिक वाढदिवस, लग्नाचे वाढदिवस, सांस्कृतिक कार्यक्रम,यात्रा-जत्रा,उरूस ,समाज सुधारकांच्या जयंती-पुण्यतिथी, इतर आनंदायी कार्यक्रमाचे निमित्त साधून रक्तदान कार्यक्रमाचे आयोजन करावे आणि संबंधित रक्तपेढ्यांना रक्ताचा पुरवठा मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्यास मागणी व पुरवठा यामध्ये समतोल साधता येईल व रुग्णांच्या चेहऱ्यावर आनंद आणता येईल.

Post a Comment

0 Comments