भाऊबीजेच्याच दिवशी बहिणीला पाहावं लागलं शहीद भावाचं पार्थिव


जम्मू काश्मीरमध्ये सीमा भागात पाकिस्तान कडून करण्यात आलेल्या गोळीबारात शुक्रवारी महाराष्ट्रातील दोन जवान शहीद झाले. कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा इथले ऋषिकेश जोंधळे आणि नागपूरच्या काटोलमधील भूषण सतई या दोन जवानांना हौतात्म्य आलं.    
(Advertise)

आज भाऊबीजेच्या दिवशीच पार्थिव त्यांच्या मूळ गावी आले.सोमवारी म्हणजेच एकिकडे भाऊबीजेचा दिवस सुरु झालेला असतानाच दुसरीकडे मात्र जोंधळे कुटुंबावर भलतीच शोकळा पसरली. बहीण- भावाच्या नात्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाच्या अशा भाऊबीजेच्या याच दिवशी जोंधळे यांच्या बहिणीच्या नशीबी मात्र नियतीनं हा दिवस लिहिला होता. 
(Advertise)

दु:ख शब्दांतही मांडता येणार नाही हा तो क्षण, जेव्हा भाऊबीजेसाठी अनेकांनाच भावाचं बहिणीकडे येणं अपेक्षित असतं. जोंधळे यांच्या धाकट्या बहिणीवाही हीच अपेक्षा होती. पण, तिला मात्र या दिवशी शहीद भावाचं पार्थिव पाहावं लागलं.  

Post a Comment

0 Comments