"मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचा पुणे विभागीय शिक्षक उमेदवार 'प्रा.डॉ.सुभाष जाधव' यांना पाठिंबा" - माजी आमदार नरसय्या आडम


अर्जुन गोडगे/बार्शी:
      
१ डिसेंबर २०२० रोजी होणाऱ्या शिक्षक व पदवीधर उमेदवार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरात संपन्न झालेल्या पत्रकार परिषदेत मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी अर्थात माकपने पक्षाचा उमेदवार उभा न करता  पुणे विभाग शिक्षक मतदारसंघासाठी  प्रा. डॉ.सुभाष जाधव यांना पाठिंबा जाहीर केला. तसेच पदवीधर मतदार संघातून पसंती क्रमांक १ साठी अरुण लाड व श्रीमंत कोकाटे यांना दुसऱ्या  क्रमांकाची पसंती जाहीर करून पाठिंबा दिला.
         
(Advertise)

सोलापूर येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पुणे विभागीय शिक्षक व पदवीधर उमेदवारासाठी  माजी आमदार  मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पार्टीचे केंद्रीय सदस्य नरसय्या आडम मास्तर यांनी वरील पाठिंबा जाहीर केला. याबाबत आपलं मत मांडताना त्यांनी पुणे शिक्षक मतदारसंघासाठी प्रा.डॉ.सुभाष जाधव हे शेतकरी व कामगार  यांच्यासाठी सातत्याने लढत असतात त्याचबरोबर कृतिशील व पुरोगामी विचारवंत प्राध्यापक असल्यामुळे शिक्षक व प्राध्यापकांच्या शैक्षणिक प्रश्नाविषयी मोठे योगदान दिल्याने पक्षाने त्यांना पाठिंबा जाहीर केला. त्याचबरोबर पदवीधर मतदारसंघासाठीचे उमेदवार 'अरुण लाड'यांना प्रथम पसंती देताना त्यांनी अखिल भारतीय किसान पंचायतीचे नेते असून शेतकरी व कामगारासाठीच्या योगदानाबद्दल विचार केला आहे.
   
(Advertise)

पदवीधर मतदारसंघासाठीचे दुसरे उमेदवार 'श्रीमंत कोकाटे'हे राष्ट्रीय स्वयं संघाच्या खोट्या हिंदुत्वाची चेहरा फाडण्याचे कार्य करून वास्तव भूमिका मांडत असतात त्याचबरोबर खऱ्या इतिहासाची पुनर्मांडणी करून समाजपरिवर्तनाचे कार्य करतात म्हणून त्यांना द्वितीय क्रमांकाची पसंती दिली. अशा प्रकारचे मत नरसय्या आडम यांनी मांडले.
  
याप्रसंगी सिटूचे राज्य सचिव एम.एच. शेख, जीवनमार्गचे संपादक डॉ.उदय नारकर, किसान पंचायतीचे जिल्हाध्यक्ष सिद्धाप्पा कलशेट्टी, दिगंबर कांबळे, भाऊ शिरोळकर, प्रा.डॉ.संतोष जेठीथोर, दत्ता चव्हाण,अनिल वासम व इतर सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments