"वारकऱ्यांना वारी नाही तर उपमुख्यमंत्र्यांनीही वारी करू नये" - वारकरी संप्रदाय



पंढरपूर/प्रतिनिधी:

कार्तिकी यात्रेनिमित्त वारकऱ्यांना पंढरपुरात येण्यास निर्बंध घातले आहेत. वारकऱ्यांना विरोध करत उपमुख्यमंत्री कार्तिकीची शासकीय महापूजा कसे करू शकतात. हा दुजाभाव शासनाने करू नये. वारकऱ्यांना वारी नाहीतर उपमुख्यमंत्र्यांनी ही वारी करू नये असे आवाहन ह.भ.प. राणा महाराज वासकर  यांनी केले आहे.

(Advertise)

कार्तिकी वारी संदर्भात वारकरी संप्रदायाची भूमिका मांडण्यासाठी महाराज मंडळांनी पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी राणा महाराज वासकर, भागवत महाराज चवरे, विष्णु महाराज कबीर, मनोहर महाराज बेलापुरकर, रंगनाथ महाराज राशनकर, जगन्नाथ महाराज देशमुख, देविदास महाराज ढवळीकर, एकनाथ महाराज हांडे, चैतन्य महाराज देहूकर, गणेश महाराज कराडकर, श्याम महाराज उखळीकर यांच्यासह अन्य महाराज उपस्थित होते.
(Advertise)

 या पार्श्वभूमीवर कार्तिकी यात्रा समन्वय समितीने पुढे होणाऱ्या सर्व निवडणूक मतदान प्रक्रीयेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय जाहीर केले आहे. त्याची सुरुवात येत्या पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकून करण्यात येणार आहे.

त्याचबरोबर वारकरी संप्रदायाला एवढे निर्बंध असतील कार्तिकी एकादशीची श्रीविठ्ठलाच्या महापुजेला बाहेरुन कोणीही न येता हि महापूजा प्रांताधिकारी यांच्या हस्ते करावी असे मत महाराजांनी व्यक्त केले आहे.

Post a Comment

0 Comments