"स्वप्न पाहण्यातच यांची चार वर्ष निघून जातील" ; दानवेंला राऊतांचं प्रत्युत्तर केंद्रीय मंत्री व भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी पुढील दोन तीन महिन्यात राज्यात भाजपाचं सरकार असेल, असा दावा केला आहे. रावसाहेब दानवे यांच्या या विधानाचा शिवसेना नेते संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. 
(Advertise)

महाविकास आघाडीचं सरकार देशातील सर्वात स्थिर आणि मजबूत सरकार असून हे सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल असा विश्वासही संजय राऊतांनी व्यक्त केला आहे. तसेच स्वप्न पाहण्यातच यांची चार वर्ष निघून जातील असा टोलाही त्यांनी लगावला.
(Advertise)

राऊत म्हणाले की, “हे सरकार चार वर्ष पूर्ण करेल. एक वर्ष पूर्ण झालं आहे आणि चार वर्ष पूर्ण करेल. निराश झाल्यानेच तसंच सर्व प्रयत्न फसल्याने विरोधी पक्षातील नेते असं वक्तव्य करत आहेत. 
(Advertise)

महाराष्ट्रातील जनता या सरकारसोबत आहे. संपूर्ण देशातील मजबूत सरकार महाराष्ट्रात आहे”. तीन दिवसांचं सरकार जे केलं होतं त्याची आज पुण्यतिथी आहे असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला.

Post a Comment

0 Comments