आदिनाथ कारखान्यातील कामगारा प्रमाणेच मकाई कारखान्यातील कामगारांना दिवाळीच्या निमित्त बोनस आणि पगारी मिळाव्यात - दशरथआण्णा कांबळे


करमाळा/ प्रतिनिधी:

करमाळा शेतकरी संघर्ष कामगार समितीच्या  वारंवार केलेल्या पाठपुराव्यामुळे आदिनाथ कारखान्यातील कामगारांना न्याय मिळाला,औद्योगीक न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे सप्टेंबर महिन्यात पगारी देण्यात आल्या होत्या. परंतु नोव्हेंबर महिन्यामध्ये दहा तारिख निघुन गेली, तरीही पगारी करण्यात आल्या नाहीत. म्हणून शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दशरथआण्णा कांबळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिला होता.
(Advertise)
 कारखान्यातील कामगारांच्या औद्योगिक न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे पगारी देण्यात आल्या त्याच प्रमाणे सभासदांच्या हक्काची साखर मिळावी, त्याबरोबर मकाई कारखान्यातील कामगारांच्या पगारी व बोनस मिळावा. मकाई कारखान्याचे चेअरमन यांनी मकाई कारखान्यातील कामगाराची दिशाभूल करून त्यांच्या भाकरीवर डोळा ठेवून चेअरमनीच चोरी केली, त्यांचा भविष्य निर्वाह निधी पगारातुन भरला जातो, त्यांच्या वयोवृद्ध झाल्यानंतर पुढील आयुष्यासाठी राखीव ठेवलेला भविष्य निर्वाह निधी हा भरला नसल्याने त्यांच्या आयुष्यावर घाव घातला म्हणून सोलापूर जिल्हा येथे प्रशासनानेच मकाई कारखान्याचे चेअरमन यांच्यावर गुन्हा दाखल केला अशी बातमी प्रशिध्द झाली होती. 
(Advertise)
म्हणून मी आदिनाथ कारखान्यातील कामगारांना न्याय मिळवून दिला, त्याचप्रमाणे मकाई कामगारांना सुद्धा न्याय मिळवून देणार असल्याचे कांबळे म्हणाले जर येत्या दोन दिवसांच्या आत मकाई कारखान्यातील कामगारांच्या पगारी व सभासदांना साखर द्यावी तसेच त्यांचा भविष्य निर्वाह निधीचे पैसे लवकरात लवकर भरावे, अन्यथा  शेतकरी कामगार संघर्ष समितीच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा  पत्रकारांशी बोलताना दिला.

Post a Comment

0 Comments