पुणे पदवीधर मतदारसंघातून सोलापूर जिल्ह्यात डॉ.श्रीमंत कोकाटे यांची प्रचारात आघाडी; स्वयंस्फूर्तीने राबतेय युवकांची फौज


बार्शी/प्रतिनिधी:

१ डिसेंबर २०२० रोजी होणाऱ्या पदवीधर उमेदवार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बार्शी शहरात संपन्न झालेल्या बैठकीत उच्चशिक्षित तरुण मोठ्या संख्येने हजेरी लावली.

पदवीधर मतदारसंघासाठीचे उमेदवार 'श्रीमंत कोकाटे'हे राष्ट्रीय स्वयं संघाच्या खोट्या हिंदुत्वाची चेहरा फाडण्याचे कार्य करून वास्तव भूमिका मांडत असतात, त्याचबरोबर खऱ्या इतिहासाची पुनर्मांडणी करून समाजपरिवर्तनाचे कार्य करतात. त्यासाठी त्यांना सोलापूर जिल्ह्यातून जास्तीत जास्त मदत देणे गरजेचे आहे असे प्रतिपादन अध्यक्षीय भाषणात गुंड यांनी केले.

(Advertise)

डॉक्टर श्रीमंत कोकाटे बोलताना म्हणाले, माझ्या विरोधात दोन साखर सम्राट उभे आहेत, हि निवडणूक मी पदवीधरांच्या सन्मानासाठी व हक्कासाठी लढत आहे. बार्शी करांचे श्रद्धास्थान असणारे कर्मवीर जगदाळे मामा यांचा आहे पाठ्यक्रमात समाविष्ट करावा म्हणून मी सर्व सर्वतोपरी प्रयत्न करीन. बुद्ध, शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर, अण्णाभाऊ साठे या महापुरुषांच्या कार्याचा आणि विचारांचा प्रचार रात्र-रात्र जीवाची बाजी लावून करत आहोत. क्रांतिसिंह नाना पाटील, कर्मवीर भाऊराव पाटील, कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांच्या त्यागातून उभी राहिलेली ही भूमी आहे ह्या भूमिकेशी प्रामाणिक राहून मी कार्य करत आहे. कष्टकरी,शेतकरी, मजूर, महिलांना हक्क अधिकार मिळावेत यासाठी आम्ही लढत आहोत. पदवीधरांना न्याय मिळावा  हे मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून यासाठी निवडणूक लढवण्याचा निर्धार मी केला आहे.
(Advertise)

तरी एक डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीत मला पसंती क्रमांक १ चे मतदान देऊन प्रचंड बहुमताने विजयी करा असे डॉक्टर श्रीमंत कोकाटे यांनी केले. यावेळी पांडुरंग गव्हाणे, दीपक गुंड, संतोष तोडकर यांच्यासह शिक्षक, पदवीधर मतदार उच्चशिक्षित तरुणांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.

Post a Comment

0 Comments