पश्चिम महाराष्ट्रातील हे विद्यमान आमदार काँग्रेसच्या वाटेवर


कॉंग्रेसचे निष्ठावंत म्हणून आवडे घराण्याची ओळख आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रकाश आवाडे यांनी कॉंग्रेस पक्षाचा राजीनामा देत इचलकरंजी विधानसभा मतदार संघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढविली होती. त्या निवडणुकीत आवाडे विजयी झाले आहेत.

(Advertise)

निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात भाजपची सत्ता होती. त्यामुळे प्रकाश आवाडे यांनी ही भारतीय जनता पक्षाला पाठिंबा जाहीर केला होता. परंतु महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे बदलली व राज्यात महाविकास आघाडीने सत्ता स्थापन केली, त्यामुळे आवडे यांना विरोधी पक्षाच्या गटात बसावे लागले.
(Advertise)

पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीचा मेळावा २१ नोव्हेंबर रोजी कोल्हापुरात झाला. त्या वेळी भाषण संपताना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसमध्ये पुन्हा यावे, अशी जाहीर ऑफर दिली. यामुळे आमदार आवडे पुन्हा कॉंग्रेसच्या वाटेवर आहेत काय? याबाबतची चर्चा सुरू झाली.
(Advertise)

महाराष्ट्राचे प्रभारी आणि कर्नाटक कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते एच. के. पाटील यांची भेट घेतल्याचे समोर आले आहे. त्यांची ही भेट मेळाव्यात चर्चेचा विषय ठरली होती, त्यामुळे आवाडे पुन्हा एकदा घरवापसी करण्याची चर्चा सुरू झाली आहे.


Post a Comment

0 Comments