परंडा पोलिसांकडून गांजाचे आंतरराज्य रॅकेट उध्वस्त ५ आरोपींच्या ताब्यातून ६४.५ कि.ग्रॅ. गांजा जप्त



परांडा/प्रतिनिधी:

चिंचोली फाटा, ता. भुम येथे दि, १० रोजी भूम पोलीसांनी नाकाबंदी दरम्यान १९.४० वा. सु. इंडीका कार क्र. एम.एच. ०६ एबी ६४५७ मध्ये असणाऱ्या चौघा व्यक्तींना ५०.३०  कि.ग्रॅ. गांजा हा अंमली पदार्थासहीत ताब्यात घेउन भुम पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला होता. या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी- सुभाष आण्णा पवार, रा. वांगी (खु.), ता. भुम याच्या शोधार्थ भुम पो.ठा. चे पोनि- श्री रामेश्वर खनाळ यांचे व परंडा पो.ठा. चे सपोनि-  राजकुमार ससाणे, पोना- खोसे, कळसाईन, काटवटे, महिला पोना- मुल्ला यांचे संयुक्त पथक परंडा हद्दीत फिरत होते.
(Advertise)
 दरम्यान या संयुक्त पथकाने अंतरगाव रस्त्यावरील सुभाष आण्णा पवार याच्या घरावर दि. १२ रोजी १७.३० वा. सु. नायब तहसीलदार- श्रीमती श्वेता अल्हाट व २ शासकीय पंचांच्या समक्ष छापा टाकला. यावेळी सुभाष पवार याच्या घरात २२ कागदी पुडक्यांत ४८.५ कि.ग्रॅ. गांजा अंगनात उभ्या असलेल्या इनोव्हा कार क्र. एम.एच. २५ एके १७७७ च्या डिकीत ५ कागदी पुडक्यांत १०.८ कि.ग्रॅ. गांजा व महिंद्रा पिकअप क्र. एम.एच. २५ पी १२२५ च्या पाठीमागील हौद्यातील गोपनीय कप्‌प्यात लपवलेल्या एका पिशवीतून ६ कि.ग्रॅ. गांजा असा एकुण ६४.५८  कि.ग्रॅ. गांजा जप्त केला. यावेळी घरात असणाऱ्या १)सुभाष आण्णा पवार २)रामदास आण्णा पवार ३)अमोल सुभाष पवार ४)आण्णा रामदास पवार, सर्व रा. वांगी (खु.) ५ )नागेंद्रबाबु सालु जेमेल्ली, रा. विशाखापट्टनम, राज्य- आंध्रप्रदेश यांना पथकाने अटक करुन त्यांच्याविरुध्द परंडा पो.ठा. येथे एनडीपीएस कायदा कलम- २० (ब) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Post a Comment

0 Comments