राहत्या घरापासून दुचाकी चोरीला, नागरिकांत चोरट्यांची भीती


बार्शी/प्रतिनिधी:

 राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचे बार्शी तालुका अध्यक्ष मंगेश मुलगे यांची दुचाकी गाडी राहत्या घरापासून चोरीला गेली आहे. रविवारी रात्री १० वाजता गाडी लॉक केल्यानंतर ते घरात गेले होते. मात्र, सकाळी उठल्यानंतर दारासमोर गाडी नव्हती.
(Advertise)

मंगेश मुलगे हे रींग रोडकडील  कश्यपी प्लॉट येथे राहत असून त्यांच्या दारासमोरून पॅशन प्रो (व्हाईट कलर ) गाडी क्रमांक - MH १३ CV २०८२ ही गाडी रात्रीच्या सुमारास चोरीस गेली आहे. या घटनेने परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले असून चोरटयांनी थेट मध्यवस्तीतून गाडी नेल्याने पोलिसांसमोर आव्हान उभे ठाकले आहे. 
(Advertise)

दरम्यान, आजूबाजूच्या CCTV फुटेजच्या माध्यमातून तपास करण्यात येत असून पोलीसात तक्रारही दिल्याचे मुलगे यांनी सांगितले.तसाच या दुचाकी चोरांचाही तपास लावणे गरजेचं आहे, तेव्हाच नागरिकांचा जीव भांड्यात पडेल.

Post a Comment

0 Comments