युवा आमदार रोहित पवार यांची घेतली सिनेसृष्टीची दखलविविध क्षेत्रात उल्लेखनीय आणि अनुकरणीय कार्य करणाऱ्या युवकांना ‘झी युवा सन्मान’ पुरस्कार जाहीर झालेआहेत. हा कार्यक्रम झी युवावर शनिवार १४ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ आणि संध्याकाळी ७ वाजता दाखवण्यात येईल. या पुरस्कार सोहळ्यात युवा नेतृत्व हा सन्मान रोहित पवार यांना देण्यात आला.

राजकारणापेक्षा समाजकारणाचं बाळकडू रोहित यांना मिळालं ते आपल्याआजोबांकडून अर्थात शरदचंद्रजी पवार यांच्याकडून. महाराष्ट्राच्या राजकारणाला रोहित यांनी अक्षरशः वाहून घेतलं. म्हणूनच मुंबईसारख्या शहरात शिक्षण पूर्ण करून गावाला येऊन शेताच्या बांधावरची माती त्यांनी कपाळाला लावली आणि अवघ्या २१व्या वर्षी बारामती ॲग्रोच्या मुख्य कार्यकारी संचालकपदाची सूत्रे समर्थपणे हाती घेतलीत आणि २०१७मध्ये तळागाळातील लोकांचे प्रश्न समजून त्यांची उत्तरे शोधावी यासाठी शिरसुफळ गुळवडी मधून जिल्हा परिषदेची निवडणूक यशस्वीपणे लढवली. २०१९ मध्ये ते कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून निवडून आणले आहेत, युवा आमदार म्हणून त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Post a Comment

0 Comments