पंढरपूर तालुक्यात ट्रॅक्टरची ऊसाने भरलेली ट्राली अंगावर पडून युवकाचा मृत्यू



पंढरपूर/प्रतिनिधी:

सध्या गळीत हंगाम सुरू झाला आहे. ट्रॅक्टरने क्षमतेपेक्षा जास्त ऊस भरला जातो. त्यामुळे अनेक अपघात घडतात. अश्याच एका अपघातात एका ३१ वर्षीय युवकाला प्राण गमवावा लागला आहे. काल सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास ऊसाने भरलेली ट्रॅक्टरची ट्रॉली अंगावर पडून महेश बलभीम भोसले (वय ३१ रा. तुंगत ता. पंढरपूर) या युवकाचा मृत्यू झाला. ही झाल्याची घटना नारायण चिंचोली ता. पंढरपूर येथे शनिवारी दुपारी चारच्या दरम्यान घडली आहे. 
(Advertise)

याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की, नारायण चिंचोली नजीक असणाऱ्या कोळेकर, मोटे वस्ती येथील कच्च्या रस्त्याने उसाने भरलेल्या दोन ट्रॉल्या घेऊन ट्रॅक्टर नारायण चिंचोली येथे येत होत्या. कच्च्या रस्त्यावरून पंढरपूर – मोहोळ मार्गावरील डांबरी रस्त्यावर ऊसाने भरलेला ट्रॅक्टर डांबरी रोडवरती चढत होता .यावेळी ट्रॅक्टर चालकास व्यवस्थित वळणं घेता न आल्याने दोन्ही
ट्रॉल्या डांबरी रस्त्या व व रस्त्याच्या कडेला कोसळल्या.

Post a Comment

0 Comments