"प्रा.डॉ.सुभाष आत्माराम जाधव यांची पुणे शिक्षक मतदारसंघाच्या प्रचारात आघाडी व शिक्षकांचा प्रचंड प्रतिसादामुळे विजय निश्चित"

सोलापूर/प्रतिनिधी :

१ डिसेंबर २०२० रोजी होणाऱ्या पुणे विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात पोहोचली असून  प्रत्येक उमेदवार आपल्यापरीने प्रचार करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र "प्रा.डॉ.सुभाष आत्माराम जाधव यांना शिक्षकांच्या  मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे पुणे शिक्षक मतदारसंघाच्या प्रचारात मोठी सरशी झाली आहे.
           
(Advertise)

प्रा.डॉ.सुभाष जाधव यांचा मुळचा पिंड हा चळवळीचा असल्यामुळे त्यांचा प्रत्येक घटकाशी अगदी जवळचा संबंध आहे. मुळात ज्येष्ठ अर्थतज्ञ,अभ्यासू व्यक्तिमत्व, संशोधक वृत्ती, लढाऊ बाणा,पुरोगामी विचारांनी भरलेली शिदोरी, प्रत्यक्ष कथनी आणि करणी यांच्यामध्ये असलेला समतोल, संविधान प्रेमी, तत्वज्ञानाची निश्चित असलेली बैठक, समाजातील प्रत्येक घटकासाठी हक्काने व न्यायासाठी  लढणारा आपला माणूस अशी असलेली प्रतिमा, शिक्षक वर्गामध्ये कोणताही भेदाभेद न करता फक्त शिक्षक या घटकासाठी अहोरात्रपणे  झटणारा शिक्षक होय.
(Advertise)

तसेच डॉ.जाधव सरांची लढाई ही  शिक्षकांचा सभ्यपणा, प्रामाणिक सेवेला विरोध करणाऱ्या घटकांच्या विरोधात आहे. या सर्वांची जाण शिक्षक वर्गाला असल्यामुळे  ते मोठ्या संख्येने जाधव सरांच्या पाठीशी आहेत.देशाची  प्रामाणिक पिढी घडवणाऱ्या या गुरुरुपी शिक्षकासाठी   अत्यंत तळमळीने झटणारा शिक्षकांचा नेता म्हणजे  डॉ. सुभाष जाधव अशी प्रतिमा आहे. त्यामुळे शिक्षक वर्गाचा पूर्ण विश्वास व पाठिंबा आहे. 
(Advertise)

याचाच परिणाम म्हणून सोलापूर विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या तिन्ही विद्यापीठांमध्ये अध्यापनाचे कार्य करणारे तसेच वरील विद्यापीठांशी संलग्न असणाऱ्या सर्व महाविद्यालयातील प्राध्यापकांचा त्यांच्यावर अटळ विश्वास आहे त्यामुळे या संबंधित विद्यापीठातील प्राध्यापक संघटनांनी एक मताने या लढाऊ नेत्याला मुंबई विधान परिषदेत आपला हक्काचा आमदार म्हणून पाठवण्याचा निर्णय घेतला व सर्वानुमते तसा ठराव करून या ठरावामध्ये प्रा.डॉ.सुभाष आत्माराम जाधव यांना पसंतीक्रम १ चे मत बहुमताने निवडून आणावे. तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक संघटनेना सरांच्या लढाऊ व्यक्तिमत्त्वाचा अनुभव असल्यामुळे डॉ. जाधव सरांच्या पाठीशी आहेत. त्यामुळे प्रा.डॉ.सुभाष आत्माराम जाधव यांचा विजय निश्चित आहे.

Post a Comment

0 Comments