" स्वराज्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने शहिदांना अनोखी सलामी व श्रद्धांजली "

प्रा.डॉ.प्रभाकर माने /शिरोळ तालुका प्रमुख प्रतिनिधी :

२६ नोव्हेंबर २००८ मध्ये पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी भ्याड हल्ल्यात शहिद हेमंत करकरे, अशोक कामटे, विजय साळसकर, तुकाराम उबाळे व विजय उन्नीकृष्णन शहीद झाले होते. त्याचबरोबर निष्पाप नागरिक बळी पडले होते.त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील वीरपुत्र ऋषिकेश जोंधळे व संग्राम पाटील यांना सीमेवर देशसेवा बजावित असताना वीरमरण आले. त्यासाठी या २६/११ बलिदानाचे औचित्य साधून 'स्वराज्य बहुउद्देशीय सामाजिक सेवाभावी संस्थेच्या' वतीने  शहिद वीरपुत्रांना अभिवादन सलामी व श्रद्धांजली देण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 
     
(Advertise)

या अभिवादन व श्रद्धांजली कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक ए. एस.ऐनापुरे यांनी करून संस्थेने दिलेले योगदान, सामाजिक कार्य- प्रगती व वाढत्या वाटचालीचा लेखाजोखा मांडला.त्यानंतर जयसिंगपुर पोलीस स्टेशनचे प्रमोद वाघ व अजित पाटील साहेब यांनी फुले वाहून व मेणबत्त्या पेटवून शहिदांना सलामी दिली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असणाऱ्या प्रतिष्ठित नागरिकांनी व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी दोन मिनिटे स्तब्ध राहून शहिदांच्या कार्याला उजाळा देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर या कार्यक्रमाची सुरुवात भूषण लोखंडे यांनी रांगोळीच्या माध्यमातून  काढलेल्या सुंदर अशा भारताचा नकाशाच्या कड्यावरती मेणबत्त्या पेटवून अनोख्या पद्धतीने अभिवादन सलामी व भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.भारत माता की जय या घोषणेने सारा परिसर दणाणून सोडला. काही काळ भावनिक वातावरणाची निर्मिती झाली होती. यानंतर बर्‍याच प्रतिष्ठित  लोकांनी भेट देऊन श्रद्धांजली वाहिली.
  
(Advertise)

या कार्यक्रमास प्रा.डॉ.प्रभाकर माने, रतन शिकलगार ,नामदेव भोसले,विजय गीते,राजू सय्यद, मोबीन मुल्ला, चंदू भंडारे, बबलू नलवडे,रफिक अत्तार, तेजस कुराडे,सागर माने,मस्तान बॉईज ग्रुप या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन स्वराज्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्था,जयसिंगपूर अध्यक्ष, इजाज मुजावर, उपाध्यक्ष शंकर कदम,सचिव ए.एस.ऐनापुरे, खजिनदार मुसेफ चौगुले,सुरेश राठोड ,इकबाल जमादार, अशोक राव व अन्य साथीदारांनी केले होते. या अनोख्या अभिवादन व श्रद्धांजली कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments