मुंबई इंडियन्सचं आयपीएलमध्ये पाचव्यांदा विजेतेपद!




 मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सला धूळ चारत पाचव्यांदा आयपीएलच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. मुंबईने पाच गडी राखून दणदणीत विजय मिळवला आहे. तसेच हा विक्रम करणारा मुंबई इंडियन्स पहिलाच संघ ठरला आहे.

दिल्लीने १५७ धावांचे लक्ष ठेवले होते पण मुंबईने या आव्हानाचा पाठलाग करत दमदार सुरुवात केली होती. कर्णधार रोहित शर्माने आणि क्विंटन डिकॉक यांनी धडाकेबाज फलंदाजी करत ४५ धावांची कामगिरी केली.
पण दिल्लीच्या स्टोईनीस आपल्या पहिल्याच चेंडूवर २० धावा करणाऱ्या डीकॉकला बाद केले. मात्र त्यानंतर सुर्यकुमार यादवने डाव सावरत आक्रमक फलंदाजी करत दिल्लीवर दबाव आणला.

रोहित शर्माने १० षटकांत ९० धावांपर्यंत मुंबईला पोहोचवले. रोहितने ३६ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. पण त्यानंतर सुर्यकुमार यादव धावबाद झाला. पण त्याचा काहीच परिणाम मुंबईवर झाला नाही कारण त्यानंतर ईशान किशनने आपल्या आक्रमक फलंदाजीने गाडी पुन्हा रुळावर आणली.

मुंबईला २४ चेंडूत २० धावांची गरज असताना रोहित शर्मा बाद झाला आणि मुंबईला तिसरा झटका बसला. त्यानंतर रबाडाने पोलार्डला ९ धावांवर बाद केले. आता १७ चेंडूत १० धावांची गरज होती पण हार्दिक पंड्याने चौकार मारत सामना जिंकवला आणि मुंबई इंडियन्स पुन्हा चॅम्पियन ठरले.

रोहित शर्मा अशी कामगिरी करणारा एकमेव कर्णधार आहे ज्याने ५ वेळा आयपीएलची ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे. रोहितच्या ५१ चेंडूत ६८ धावांच्या खेळीने मुंबईला खूप मदत झाली. मुंबईची टीम १३ आयपीएलमध्ये सर्वाधिक पाचव्यांदा चॅम्पियन ठरली आहे.

Post a Comment

0 Comments