पंढरपूर/प्रतिनिधी:
श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या वतीने श्री.विठ्ठल व रूक्मिणीमातेचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. त्यानिमीत्त आज श्री.विठ्ठल व रूक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात व मंदिरात तसेच नामदेव पायरी येथे सुंदर व मनमोहक अशी रंगीबेरंगी फुलाची व फळाची आरास करण्यात आली आहे. आजची सजावट पुण्याचे भाविक भारत भुजबळ ह्यांच्याकडून करण्यात आली आहे.
विठ्ठल व रुक्मिणीमातेच्या गाभार्यात जेरबेरा, झेंडूंच्या फुलांची आकर्षक आरास करण्यात आली होती. त्याचबरोबर गाभार्यासह मंदिरातही आकर्षक फुलांसह फळांची आरास करून सजवण्यात आल्याने गाभारा व मंदिराचे रूप मनमोहक दिसत होते. फुलांबरोबर फळांची आरास विठ्ठल व रुक्मिणी मातेला यावेळी करण्यात आली होती, त्यामध्ये प्रामुख्याने सफरचंद, संत्री अशा फळांचा समावेश करण्यात आला होता. त्यामुळे विठ्ठल-रुक्मिणी मातेचा गाभारा मनमोहक रूपांनी सजला होता, विठ्ठल व रुक्मिणी मातेला विविध अलंकारांनी सजवण्यात आली होती.
ऑनलाईन बुकिंग करून भाविकांना विठ्ठल-रुक्मिणी मातेचे हे रूप भाविकांना याची देही याची डोळा पाहण्यास मिळाली, त्यामुळे भक्तां मधून समाधान व्यक्त होत आहे. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात सुंदर आकर्षक रांगोळी रेखाटण्यात आली होती. सर्व भक्तांना या रांगोळीच्या माध्यमातून देण्यात आल्या होत्या. यावेळी अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर समितीच्या कर्मचार्यांनी केली आहे.
0 Comments