खासदार संजय पाटील भाजपमध्ये रमेना मन....



भाजपचे खासदार संजय पाटील यांची भाजपच्या तंबूपेक्षा राष्ट्रवादीच्या गोटातील उपस्थिती लक्षणीय वाढली आहे. जिल्हा परिषद, काही पंचायत समित्या, नगरपालिका आणि महापालिका यांच्यावर सध्या भाजपची सत्ता आहे. 

एक खासदार, सांगली-मिरजेचे विधानसभेचे आमदार, सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर हे विधान परिषदेचे सदस्य एवढी सत्तास्थाने सद्य:स्थितीला भाजपच्या तंबूत असताना आर्थिक केंद्रे असलेल्या सत्तास्थाने काबीज करण्यासाठी अद्याप सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपमध्ये कोणत्याच हालचाली नाहीत.

खासदारांनी पुढाकार घेऊन तासगाव येथे कोव्हिड सेंटर सुरू केले. या कोव्हिड सेंटरचे उद्घाटन पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या उद्घाटनाकरिता भाजपच्या पदाधिकाऱ्यांना बोलावण्याची औपचारिकताही पाळली नाही. गेल्या आठवडय़ामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये सांगलीत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. तसेच अतिवृष्टी झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांचा सांगली दौरा झाला. या वेळी पक्षाचे खासदार यापासून अलिप्त होते.

Post a Comment

0 Comments