"बाळासाहेबांचं मंत्रालयावर भगवा फडकविण्याचं एक स्वप्न पूर्ण" - छगन भुजबळ ”मंत्रालयावर भगवा फडकवण्याचं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं एक स्वप्न पूर्ण झालं आहे. मराठी माणसाचं पाऊल पुढे नेण्याचं दुसरं स्वप्नही आम्ही पूर्ण करु,” अशी भावना राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिलं. 
(Advertise)

बाळासाहेबांच्या ८ व्या स्मृतिदिनानिमित्त भुजबळ छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील स्मृतिस्थळावर दर्शनासाठी आले होते. त्यावेळी ते बोलते होते. 
(Advertise)

“बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे स्मृतिस्थळावर आलो आहे. यावर्षी मंत्रालयावर शिवसेनेचा भगवा फडकवण्याचं आणि शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्याचं बाळासाहेबांचं स्वप्न नियती आणि जनतेने पूर्ण केलं आहे. 
(Advertise)

यामुळे यंदा विशेष महत्त्व आहे. जनतेचे प्रश्न सोडवण्याची आमच्यावर जबाबदारी आहे. बाळासाहेबांचं आणखी एक स्वप्न होतं, की महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाचं पाऊल पुढे गेलं पाहिजे, हे आम्ही पूर्ण करु” अशा भावना भुजबळांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी व्यक्त केल्या आहेत.

Post a Comment

0 Comments