मुंबईत आलेल्या भाचीवर मावशीच्या नवऱ्याने २ महिने केले अत्याचार


१७ वर्षीय मुलीवर मावशीच्या नवऱ्याने दोन महिने वारंवार अत्याचार केले. या प्रकरणी भोईवाडा पोलिसांनी ४० वर्षीय आरोपीला अटक केली आहे.

 पोलिसांच्या माहितीनुसार, लॉकडाऊनच्या काळात मुलगी आपल्या मावशीच्या घरी आली होती. ती पुन्हा आपल्या घरी धुळ्याला परतल्यानंतर ही घटना उघडकीस आली. मावशीच्या नवऱ्याने केल्याचे मुलीने आपल्या पालकांना सांगितले. पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतल्यानंतर मंगळवारी आरोपीला अटक केली आहे. 

पीडित मुलगी परळला तिच्या मावशीच्या घरी आली होती. इतर सदस्य घराबाहेर पडल्यानंतर मावशीचा नवरा तिच्यावर अत्याचार करत असे, असा पीडित मुलीचे म्हणणे आहे. तेथे गेल्यानंतर पोटात दुखू लागल्याने डॉक्टरकडे नेले. वैद्यकीय तपासणीनंतर तिच्यावर अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले. तिच्या पालकांनी तिला विश्वासात घेऊन विचारणा केली. त्यावेळी तिने घडलेला प्रकार सांगितला. 

रुग्णालयाकडून स्थानिक पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. त्यांनी झिरो एफआयआर नोंदवून हे प्रकरण भोईवाडा पोलिसांकडे वर्ग केले. या प्रकरणी मंगळवारी गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली आहे. या घटनेचा अधिक तपास केला जात आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. मावशीच्या नवऱ्याने अत्याचारावेळी व्हिडिओ काढला होता. या घटनेबाबत कुणाकडे वाच्यता केल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन वारंवार अत्याचार केले, असे पीडितेने पोलिसांना सांगितले.

Post a Comment

0 Comments