"फडणवीसांनी सत्तेचा गैरवापर केला" - पृथ्वीराज चव्हाण


 शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडीचे छापे पडल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. आता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. 
(Advertise)

फडणवीसांनी सत्तेचा गैरवापर केला असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. मला काही दिवसांपूर्वी प्राप्तिकर विभागाची नोटीस आली होती. त्यापूर्वी शरद पवार, सुप्रिया सुळे यांनादेखील नोटीस आली होती. हा सर्व प्रकार निषेधार्ह आहे, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले.
(Advertise)

विरोधी पक्षांच्या प्रमुख माणसांना टार्गेट केले जातेय. सत्ताधारी पक्षाने गेल्या पाच वर्षात केलेले आर्थिक भ्रष्टाचार दिसत नाहीत, असा आरोप पृथ्वीराज चव्हाणांनी केला.  देवेंद्र फडणवीसांनी सत्तेचा गैरवापर केला. 
(Advertise)

आमच्याकडेही सत्ता होती पण आम्ही साम, दाम, दंड आणि संस्थांचा वापर केला नव्हता, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.आम्ही महाविकास आघाडी सरकार स्थापन केले नसते तर आमचे राहिलेले नेतेही त्यांनी त्यांच्या पक्षात घेतले असते. असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

Post a Comment

0 Comments