अनेक आमदार संपर्कात आहेत; आम्ही ठरवले तर भाजप एका क्षणात मोकळी करू - नबाब मलिक


भारतीय जनता पक्ष सातत्याने महाविकास आघाडीवर टीका करताना दिसत आहे. जवळपास सर्वच नेत्यांकडून सांगण्यात येते की, हे सरकार आता कोसळणार आहे. व पुन्हा भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन होणार आहे. 
(Advertise)
यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी चांगलाच समाचार घेतला असून ते म्हणाले की, आम्ही ठरवले तर एका क्षणात भाजप रिकामी होईल. भारतीय जनता पक्षाचे अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत. त्याचा लवकरच एक ट्रेलर बघायला मिळेल.
(Advertise)
त्यांनी ट्विट मध्ये असेही म्हणले आहे की, माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसजी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष व इतर काही नेते गेल्या १ वर्षांपासून अशी विधाने करत आहेत. कारण सत्येशिवाय त्यांना राहता येत नाही. महाविकास आघाडी सरकार ५ वर्ष पूर्ण करणार आहे.
(Advertise)
कारण आमचे सरकार हे एकजुटीने किमान समान कार्यक्रमावर काम करत आहे. तिन्ही पक्षाची विचारधारा वेगळी आहे पण कोणीही आपली विचारधारा सोडून सरकारमध्ये सामील झालेले नाही.

Post a Comment

0 Comments