" प्रा.महादेव सुर्यवंशी यांना शारीरिक शिक्षण विषयात पीएच.डी.पदवी संपादन"

प्रा.डॉ.प्रभाकर माने/शिरोळ तालुका प्रमुख प्रतिनिधी

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड अंतर्गत शारीरिक शिक्षण या विद्याशाखेत  प्रा.महादेव सुखदेव सुर्यवंशी  यांना पीएच.डी. ही पदवी प्राप्त झाली आहे. "कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन खेळाडूंना धनुर्विद्येची कौशल्ये आत्मसात करताना येणाऱ्या समस्यांचा शोध : एक अभ्यास" या संशोधन विषयात ही पदवी संपादन करण्यासाठी त्यांना शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त डॉ.बी.एन.यादव यांचे बहुमोल मार्गदर्शक  लाभले.प्रा.डॉ.सुर्यवंशी हे सध्या जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर येथे शारीरिक शिक्षण संचालक म्हणून गेली १६ वर्षे सेवेत कार्यरत आहेत.
       (Advertise)

कोव्हिड -१९ च्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने ऑनलाइन ओपन डिफेन्स आयोजित केला होता. हा ओपन डिफेन्स सांगोपांग पद्धतीने संशोधनात्मक चर्चा घडवून आणणारा होता. शारीरिक शिक्षण या विषयात पीएच.डी. धारकांची व मार्गदर्शकाची संख्या अत्यल्प असून या पार्श्वभूमीवर प्रा.सुर्यवंशी यांनी या विषयात केलेलं काम संशोधनात्मक  पातळीवर कौतुकास्पद आहे. त्यांना मिळालेल्या डॉक्टरेट पदवीचा लाभ समाजासाठी निश्चितच होईल अशी अपेक्षा आहे. त्यांच्या या पीएच.डी. पदवी संपादनाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.त्यांना या कामी शारीरिक संघटनेतील प्राध्यापकांचे बहुमोल सहकार्य लाभले त्याचबरोबर त्यांची पत्नी  व कुटुंबियांचा खूप पाठिंबा मिळाला.

Post a Comment

0 Comments