केंद्रीय दळणवळण मंत्री नितिन गडकरींकडे केलेल्या सोलापूरच्या उड्डाणपुलां विषयीच्या तक्रारीला एन.एच.ए.आय.चे आले सकारात्मक उत्तर


गिरिकर्णिका फाऊंडेशनच्या प्रयत्नांना आले मोठे यश

२०१७ साली केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते सोलापूरच्या दोन उड्डाण पुलांचे कोनशिला समारंभ मोठ्या थाटामाटात करण्यात आले आणि काही दिवस सर्व्हक्षणाचे कार्य देखिल झाले, पण त्यानंतर सोलापूर महानगरपालिकेने जमीन मोबदल्याचे कारण पुढे रेटुन सदर प्रकल्पांवर कोणतीही हालचाल केली नाही. सोलापूरकरांचा सदर विषयावरचा रोष लक्षात घेऊन गिरिकर्णिका फाऊंडेशनने केंद्रीय दळणवळण मंत्री नितिन गडकरींकडे इमेलद्वारे सदर प्रकारा विषयी तक्रार केली.
(Advertise)

केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी गिरिकर्णिका फाऊंडेशनच्या तक्रारीची त्वरित दखल घेऊन एन.एच.ए.आय.चे सोलापूर विभागाचे प्रकल्प संचालक संजय कदम यांना सदर प्रकरणावर गिरिकर्णिका फाऊंडेशनला खुलासा करण्या विषयी निर्देश दिले. सोलापूर शहरासाठी मंजुर दोन उड्डाण पुल, जुना बोरामणी नाका ते कुमठा नका तथा जुना पुना नका ते सात रस्ता विषयी संजय कदम यांनी सोलापूर महानगरपालिके समवेत वेळोवेळी सकारात्मक चर्चा आणि पत्रव्यवहार सुरू असुन, सोलापूरातील दोन्ही उड्डाण पुलांचे कार्य त्वरित सुरू करण्यासाठी एन.एच.ए.आय. प्रयत्नशील आहे असे गिरिकर्णिका फाऊंडेशनला पत्राद्वारे खुलासा प्राप्त झाला आहे.
(Advertise)

गिरिकर्णिका फाऊंडेशनने सोलापूरच्या विकासाशी निगडित अतिशय महत्त्वपूर्ण विषयांवर केंद्र, राज्य आणि स्थानिक पातळीवर अभ्यासपूर्ण मांडणी करून नागरी प्रश्नांची सोडवणूक करण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने करत आहे असे गिरिकर्णिका फाऊंडेशनचे अध्यक्ष विजय कुंदन जाधव यांनी नमूद केले. सोलापूरकरांच्या समस्या सोडविण्यासाठी गिरिकर्णिका फाऊंडेशनने केंद्रीय स्थावर अनेक मुद्दे परखडपणे मांडुन त्यांची सोडवणूक केली असुन, त्याचा सकारात्मक परिणाम शहर विकासात मध्ये दिसुन येत आहे.

Post a Comment

0 Comments