राज्यातील महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष होत आहे. त्यानिमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची परखड मुलाखत शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘दैनिक सामना’मध्ये प्रसिद्ध होणार आहे.
विशेष म्हणजे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची रोखठोक मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीचा दुसरा प्रोमो खासदार संजय राऊत यांनी आपल्या ट्विटर हँडलवर पोस्ट केला आहे. पहिल्या प्रोमोप्रमाणेच दुसऱ्या प्रोमोमध्येही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आक्रमक रुपात दिसत आहेत. उद्धव ठाकरेंनी आपल्या नेहमीच्या ठाकरे शैलीत भाजपवर निशाणा साधला.
तुमचं हिंदुत्व हे “दलालांचं हिंदूत्व” असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठाकरी शैलित विरोधकांना ठणकावलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शिवसेना नेते संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दूसरा प्रोमो आता प्रसिद्ध करण्यात आला आहे.
या प्रोमोत शुद्ध भगवा, हिंदूत्त्व, वीज बील, भ्रष्टाचारांचे आरोप आणि सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी झालेल्या राजकारणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रोखठोक उत्तरं दिली आहेत.
0 Comments