भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी पक्षात जाहीर प्रवेश केला होता. त्यात आता राज्यपाल कोश्यारी यांनी एकनाथ खडसे यांचे तोंड भरून कौतुक केले आहे. विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्तीत पदासाठी राष्ट्रवादी पक्षाकडून खडसे यनाचे नाव पाठवण्यात आले आहे. मात्र अद्याप राज्यपालांनी या १२ नावांवर कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यात खडसे यांचे राज्यपालांनी कौतुक केल्यामुळे नव्या चर्चेला उधाण आले आहे.
एकनाथ खडसे यांनी सुनील नेवे लिखित त्यांचं आत्मचरित्र ‘जनसेवा मानबिंदू एकनाथराव खडसे’ या पुस्तकाची प्रत भगतसिंह कोश्यारी यांना पाठवली होती. भगतसिंह कोश्यारी यांनी पुस्तकावर अभिप्राय लिहून पाठवला असून यामध्ये एकनाथ खडसेंच्या राजकीय, सामाजिक आणि संसदीय कारकीर्दीचे कौतुक केले आहे.
काय म्हणाले राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
जनसेवा मानबिंदू एकनाथराव खडसे हा डॉ. सुनिल नेवे यांनी लिहिलेला ग्रंथ प्राप्त झाला. पुस्तकाच्या माध्यमातून आपले व्यक्तीमत्व, आपले समाजकारण, राजकारण, संसदीय कार्य, वैचारिक भूमिका तसेच विधानसभा सदस्य म्हणून योगदान यांसह आपल्या व्यापक सेवाकार्य यांचा अभ्यासपूर्ण आलेख मांडला आहे. यानिमित्त मी आपले हार्दिक अभिनंदन करतो आणि आपणास सुयश चिंतितो असा अभिप्राय राज्यपालांनी नोंदवला आहे.
0 Comments