करमाळा/प्रतिनिधी:
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भिवरवाडी येथील कु. प्रत्यंजा सतीश चिंदे व कु. सुहाना रिजवान मुलाणी या दोन विद्यार्थिनींची नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा परीक्षेत पात्र म्हणून निवड झाली आहे.
ही परीक्षा ११ जानेवारी, २०२० रोजी घेण्यात आली होती .यामध्ये नवोदय विद्यालय पोखरापूर येथे ८० विद्यार्थ्यांची निवड केली जाते. त्यापैकी भिवरवाडी या एकाच शाळेचे दोन विद्यार्थी प्रवेश पात्र झाले आहेत.
भिवरवाडी येथे सातवीपर्यंत वर्ग असून तीनच शिक्षक कार्यरत आहेत तरीसुद्धा या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी योग्य ती मेहनत घेऊन हे यश मिळवले आहे. या विद्यार्थ्यांना वर्गशिक्षक सतीश चिंदे यांचे मार्गदर्शन लाभले तसेच मुख्याध्यापक विजयकुमार ननवरे व उपशिक्षिका मनीषा गायकवाड -उघडे यांचेही सहकार्य लाभले.
या यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करमाळा तालुक्याचे सभापती गहिनीनाथ ननवरे, उपसभापती दत्तात्रय सरडे गटशिक्षणाधिकारी राजाराम भोंग, विस्ताराधिकारी मंगल लिंबा शिंदे, केंद्रप्रमुख अजिनाथ तोरमल , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भैरू आरकिले यांनी अभिनंदन केले.
0 Comments