आज सकाळी सुभाष रोडवर असलेल्या दिनेश एन्टरप्राईजेसच्या जवळ कोणीतरी फटाके वाजवल्याने याची ठिणगी दुकानात पडली आणि दुकानातील साहित्याने पेट घेतला.
आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले होते. वेळीच आग आटोक्यात आल्याने इतर साहित्य वाचले.
सुभाष रोडला दिनेश एन्टरप्राईजेस नावाची फर्निचर दुकान आहे. या दुकानाच्या परिसरामध्ये काहींनी सकाळी फटाके फोडल्याने फटाक्याची ठिणगी दुकानात पडली आणि आतील वस्तूूंनी पेट घेतला.
आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते. वेळीच आग आटोक्यात आल्यामुळे दुकानातील मोठे नुकसान टळले. या दुकानात फ्रिजसह इतर इलेक्ट्रॉनिक साहित्य होते.
0 Comments