"शिक्षकांनी उमेदवारांच्या राजकिय पुनर्वसनासाठी मतदान न करता त्यांचे प्रश्न सोडविणाराला मतदान करावे" - दादासाहेब गाडे- पाटील


ज्या दिवसापासून शिक्षक निवडणुकीचे बिगुल वाजले त्या दिवसापासुन प्रत्येक राजकीय पक्षाने त्यांच्या राजकिय कार्यकर्त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी प्रत्येक राजकिय पक्षानी धडपड सुरु केली. परंतु या सर्व घडामोडींमध्ये नावाजलेल्या राजकिय पक्षांना सुध्दा समन्वय साधता आला नाही. त्यामुळे राजकिय पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी दिसुन आली. आता याठिकाणी प्रश्न असा पडतो कि, या सर्व घडामोडींमध्ये महापुरुषांचे विचार सांगणाऱ्या अनेक पक्षांमध्ये विचारांचा अभाव दिसुन येतो. असे मत रयत शिक्षण सेवक मित्र मंडळाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष दादासाहेब गाडे - पाटील यांनी लोकवार्ताच्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केले.
     
(Advertise)

पुढे बोलताना गाडे म्हणाले, रयत शिक्षण संस्थेमध्ये ज्याप्रकारे ज्ञानदान केले जाते. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना ज्ञानदान करणारा शिक्षक हि तेवढाच सक्षम असा निवडला जातो. या सर्व बाबींचा विचार करता. रयत सेवक मित्र मंडळाचे सचिव व महाराष्ट्र माध्यमिक डि.एड. महासंघाचे कार्याध्यक्ष श्री. नंदकिशोर गायकवाड यांना शिक्षकांच्या प्रश्नांची जाण व महापुरुषांच्या विचारांवर चालण्याचा वसा घेतलेला आणि शिक्षकांसाठी रस्त्यावर उतरुन त्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारे व्यक्तिमत्व व कोणते ही राजकारण न करता फक्त १००% समाजकारण असा वसा असलेले उमेदवार म्हणुन श्री. नंदकिशोर गायकवाड यांना पुणे विभाग शिक्षक मतदार संघातुन उमेदवारी देण्यात आली आहे.
    
(Advertise)

आजपर्यंतचे सरांनी शिक्षकांसाठी निस्वार्थी, जातविरहित, धर्मविरहित आणि निर्मळ मनाने केलेले कार्य व शिक्षकांच्या सोडविलेल्या अडचणींची शिक्षकांनी जाण ठेवत. पुणे, सोलापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या ठिकाणच्या प्रचारात शिक्षकांनी गायकवाड सरांनाच मतदान करणार असल्याचे अभिवचन दिले आहे. त्यामुळे सुज्ञ शिक्षक मतदारांनी कार्यकर्त्यांचे राजकिय पुनर्वसन न करता. महापुरुषांच्या विचारांचे जतन आणि पुनर्वसन करणारे गायकवाड यांना प्रथम पसंतीचे मत देऊन विजयी करावे. असे दादासाहेब गाडे यांनी शिक्षक मतदारांना आवाहन केले.

Post a Comment

0 Comments