मराठवाड्यात शिवसेनेशिवाय कोणीही येऊ शकणार नाही- चंद्रकांत खैरे१९८८ पासून बाळासाहेब ठाकरे यांच्या संभाजीनगर आल्यापासून शिवसेनेचे अस्तिव निर्माण केले. मराठवाडा हा शिवसेनामय केला आहे, शिवसेनेशिवाय मराठवाड्यात कोणीही येऊ शकणार नाही, अशा माजी खासदार चंद्रकांत खैरेंनी म्हटलं आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन केलं. यानंतर चंद्रकांत खैरेंनीमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांना अनेक विषयांवर भाष्य केलं.

शिवसेना प्रमुखांचा आशीर्वाद हा मराठवाड्यावर आहेच. कोरोना संपु द्या, मग बघा कसे दौरे करतो. शिवसेनेशिवाय किंवा महाआघाडीशिवाय मराठवाड्यात दुसरं कोणीही येऊ शकणार नाही, असं खैरे म्हणाले.

स्मृतिदिनानिमित्त येथे आल्यानंतर शक्ती मिळते. स्मृतिदिन एकट्या शिवसेनेसाठी नाही, तर तमाम जनतेसाठी शक्ती स्थळ आहे, येथे ऊर्जा मिळते, असंही चंद्रकांत खैरेंनी म्हटलंय.

Post a Comment

0 Comments