दौंड: पुणे-सोलापूर महामार्गावरील त्रिमुर्ती हॉटेलवर पोलिसांना छापा टाकून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.यवत पोलिसांनी ही कारवाई केली असून मराठी तरुणीसह तीन महिलांची सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी हॉटेल मालकासह तिघांना अटक केली आहे. हॉटेल मालकांचा गेम त्यांच्यावर पलटला. त्या तरुणीची सुटका करण्यात आली.
पुणे-सोलापूर महामार्गावर ठिकाणी देह विक्री व्यवसाय सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. दौंडचे पोलीस उपअधीक्षक राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली यवत पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या पथकाने त्रिमुर्ती हॉटेलवर छापा टाकला.
त्रिमुर्ती हॉटेलमध्ये वेश्या व्यवसायासाठी ठेवलेल्या तीन महिलांची सुटका करण्यात आली. तर हॉटेल चालक प्रभाकर गोपाल शेट्टी व अन्य दोन्ही साथीदारांना अटक करण्यात आलेली आहे. पुढील तपास पोलिस उपअधीक्षक राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील करत आहेत.
0 Comments