उदयनराजे यांच्या जलमंदिर पॅलेस मधून चांदीच्या बंदुकीची चोरी


छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या जलमंदीर पॅलेस येथून  एका कामगाराने शोभेच्या चांदीच्या बंदूकीची चोरी केली ती बंदूक साताऱ्यातील एका सोने-चांदीच्या व्यवसायाकडे विक्रीसाठी जात असताना सातारा शहर शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल संजू गुसिंगे यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली. 

त्यासंशयित चोरट्याची झडती घेतली असता त्याच्याकडे साधारण दोन फूट लांब ,अंदाजे दीड किलो वजन असलेली चांदीची बंदूक आढळून आली.संशयित इसमाकडे अधिक चौकशी केली असता त्याने ही बंदूक खा.उदयनराजेंच्या जलमंदीर पॅलेस येथून चोरल्याची कबूली पोलिसांना दिली.या संशयित आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments