विठू नगरी ८ महिन्याच्या विश्रांतीनंतर पूर्वपदावर, मुखदर्शनाची संख्या एक हजाराहून दोन हजारावर


पंढरपूर/प्रतिनिधी:

श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना ऑनलाईन पद्धतीने नाव नोंदणी करुन विठ्ठलाचे मुखदर्शन घडवण्याचे नियोजन मंदिर समितीने केले होते. कोरोना विषाणू या रोगाच्या प्रादुर्भावामुळे १ दिवसात १००० भविकांना दर्शन देण्याचे ठरले होते, परंतु या संख्येत एक हजाराने वाढ करण्यात आली आहे. यामुळे आजपासून २ हजार भाविकांना विठ्ठलाचे मुखदर्शन दर्शन घेण्याची सोई मंदिर समितीकडून करण्यात आली. करुणा विषाणू प्रतिबंधक सर्व नियम पाळत पंढरपुरात भाविकांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले. 
(Advertise)

व्यापारी व भक्तांकडून सोशल डिस्टंसिंग

समोर विठ्ठल मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले मात्र करुणा चा प्रादुर्भाव असल्यामुळे विठ्ठल मंदिराकडून मुखदर्शनाची सोय करण्यात आले मंदिर प्रशासनाकडून औरंगाबादच्या प्रतिबंधक उपाय योजना जोरदारपणे करण्यात आले मात्र पंढरीत येणाऱ्या भाविकांनी एसटी तसेच खाजगी वाहनातून कोणत्याही प्रकारच्या करूना प्रतिबंधक उपाययोजना पंढरपूर नगरपालिका प्रशासन करताना दिसत नाहीये तसेच वारकरी व भक्त पंढरपुरात तोंडाला नमाज व सोशल डिस्टंसिंग पूर्णपणे फज्जा उडाला तसेच पंढरपुरातील व्यापारी वर्गाकडून करण्याबाबतचे कोणते नियम पाळले जात नाही त्यामुळे करुणा महामारी चे प्रादुर्भाव वाढण्याची चिन्हे दिसत आहे
(Advertise)

पंढरपुरात वाढली वर्दळ

कोरोना विषाणू संक्रमणाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी धार्मिक स्थळं मार्च महिन्यांपासून बंद होती. सोमवारी मंदिर खुले होताच पंढरपुरात वर्दळ अचानक वाढली. सोमवारी रात्रीच दूरवरचे काही भाविक दर्शनासाठी दाखल झाले. त्यामुळे संत गजानन महाराज संस्थानच्या मठ आणि भक्त संकुलमधील रूम फुल्ल झाल्या होत्या. काही भाविक खासगी लॉजमध्येही थांबले होते.
(Advertise)

परिणामी, गत आठ महिन्यांपासून बंद असलेले लाॅजही उघडण्यात आले. दरम्यान, सोमवारी रात्री मुक्कामी आलेल्या भाविकांमुळे हॉटेल आणि लॉजींग व्यवसाय तेजीत आला आहे. काही भाविक स्वत:च्या वाहनाने शेगावात येत असल्याने काहींच्या हाताला पार्किगच्या माध्यमातून काम मिळाल्याचे चित्र मंगळवारी संतनगरीत दिसून आले.
(Advertise)

विठू नगरीत एसटी व खाजगी वाहनातून प्रवासी दाखल

राज्याच्या विविध भागातून एसटी बस आणि खासगी प्रवासी वाहतुकीने विठूनगरीत दाखल झालेल्या हजारो भाविकांनी ऑटो रिक्षा आणि इतर वाहनांना मंदिरात येण्यासाठी प्राधान्य दिलेे. त्यामुळे खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांनाही अचानक दिलासा मिळाला. हॉटेल आणि लॉज व्यावसायिकांनीही मंदिर उघडल्याचे समाधान व्यक्त केले. बंद असलेला व्यवसाय सुरू होऊन विस्कटलेली आर्थिक घडी रुळावर आणण्यासाठी मंदिर उघडण्याचा निर्णय अतिशय योग्य असल्याचे नागरिकांमधून व्यक्त होत आहे. हार फुलविक्रेत्यांच्या चेहऱ्यावरही मंगळवारी समाधान दिसून आले. मंदिरात हार फुले आणि प्रसाद आणण्यास मनाई असली तरी पंढरपूरात येणारे भाविक घरी नेण्यासाठी प्रसाद आणि हार खरेदी करीत असतो. अष्टगंध, कुंकु आणि इतर साहित्य विक्री करणाऱ्या महिलांनी मंदिराच्या प्रवेशद्वारावर विविध साहित्याची दुकाने थाटली होती. या दुकानांवरूनही भाविकांनी खरेदी केल्याचे दिसून आले.
(Advertise)

आर्थिक घडी हळूहळू पूर्वपदावर
पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर भाविकांना दर्शनासाठी सोमवारी खुले करण्यात आले. त्यामुळे गत आठ मंहिन्यांपासून पंढरपूर विस्कटलेली आर्थिक घडी आता हळूहळू पूर्वपदावर येणार असल्याचे संकेत आहेत. मंगळवारी पहिल्याच दिवशी मोठ्याप्रमाणात भाविक दाखल झाले. परिणामी, पार्किंग आणि वाहन व्यवस्थेला चालना मिळाल्याचे दिसून आले. चहा, नास्ता, खानावळ आणि हॉटेल व्यवसायालाही लाभ होणार असल्याचे सोमवारी दिसून आले.
(Advertise)

प्राथमिक सुरक्षिततेनंतरच दर्शन

दर्शनासाठी भाविकांच्या संख्येवर मर्यादा आणि वेळेवर निर्बंध यासह ऑनलाईन दर्शन बुकिंग असेलच तर आत सोडण्यात येत होते. मात्र श्रीं चे मुख दर्शनासह तात्काळ दर्शन मिळणार असल्याने तेथे एकच जल्लोष पहायला मिळत आहे. मंदिरात व नामदेव पावरी ते दर्शन रांगेत स्वच्छतेबरोबरच सॅनिटायझर फवारण्यात आले आहे. दर्शन रांगेत दोन भाविकांमध्ये सोशल डिस्टन्स राखला जाईल, याची खबरदारी घेण्याच्या अनुषंगाने तयारी करण्यात आली आहे. त्याचबरोबर मंदिरात येणार्‍या भाविकांकरीता सॅनिटायझरची सोय, थर्मल स्क्रिनिंगची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. त्याचबरोबर शासनाच्या निर्देशानुसार मंदिरात दर्शनाकरीता येणार्‍या भाविक, भक्तांनी मास्क वापरणे सक्तीचे करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments