"कर्मवीर औदुंबरआण्णा पाटील प्रतिष्ठानचा डाॅ.श्रीमंत कोकाटे सरांना जाहिर पाठींबा !"



पंढरपूर/प्रतिनिधी:

 पुणे पदवीधर मतदार संघातून निवडणुक लढवत असलेले डाॅ.श्रीमंत शिवाजी कोकाटे यांना कर्मवीर औदुंबरआण्णा पाटील प्रतिष्ठान,पंढरपूर यांनी जाहिर पाठिंबा घोषित केला आहे.

याबाबत माहिती देताना कर्मवीर औदुंबरआण्णा पाटील प्रतिष्ठानचे संस्थापक अमरजित पाटील यांनी सांगितले की,पुणे पदवीधर निवडणुक हि पदवीधरां हक्क - अधिकारांसाठीची निवडणुक आहे.या निवडणुकीमध्ये राजकीय पक्षांची ढवळाढवळ पदवीधरांना त्यांच्या संवैधानिक हक्क अधिकारापासून डावलण्याचे कारस्थान आहे.डाॅ.श्रीमंत शिवाजी कोकाटे हे उच्च पदवीधर आहेत.त्यांच्याकडे १२ विषयातील पदव्या आहेत.या न्यायाने पदवीधर निवडणुकीमध्ये आमदार म्हणून निवडून येण्याचा त्यांचा नैसर्गीक हक्क आहे.मुळात पदवीधरांचे नेतृत्व कोणी ही आडाणी आणि राजकीय व्यक्ती करु शकत नाही.हे वास्तव आहे.
(Advertise)

त्यामुळे आम्ही पंढरपूर तालुक्यातील कर्मवीर औदुंबरआण्णा पाटील यांना मानणार्‍या आणि माझ्या सोबत गेली २०/२२ वर्ष संभाजी ब्रिगेडसह बहुजन चळवळीमध्ये काम केलेल्या व करत असलेल्या विविध संस्था,संघटनाच्या सर्वच पदाधिकारी व कार्यकर्ते व पदवीधरांना नम्र विनंती करतो की,दिनांक १ डिसेंबर २०२० रोजी,सकाळी ८ ते सायं ५ पर्यंत आपण आपले मतदान करावे.डाॅ.श्रीमंत शिवाजी कोकाटे यांच्या नावापुढे पसंती क्र. १ लिहावा.असे जाहिर आवाहन करित आहे.

Post a Comment

0 Comments