“बिहार इलेक्शन निकाल ! भाजप मित्रांनाच संपवतोय” - रोहित पवारबिहार विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अखेर एनडीएला विजय मिळाला. मात्र नितीश कुमार यांच्या जेडीयूपेक्षा जास्त जागा भाजपने जिंकल्या असून भाजप आता एनडीएमध्ये मोठ्या भावाच्या भूमिकेत दिसणार आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

भाजप ज्या पद्धतीने मित्रांनाच संपवतोय याचं उत्तम उदाहरण बिहारमध्ये पहायला मिळालं, अशा शब्दात रोहित पवार यांनी भाजपवर टिकास्त्र सोडले आहे. यातून बोध घेऊन नितीश कुमार जी हे त्यांच्याशी झालेला घात पचवतात की काही वेगळा निर्णय घेतात, हे पहावं लागेल, असही रोहित यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.


Post a Comment

0 Comments