"रविचंद्रन आश्विन भारतासाठी टी-२० मध्ये उपयुक्त" - मोहम्मद कैफ


भारतीय संघाचा माजी खेळाडू मोहम्मद कैफने, टी-२० क्रिकेटमध्ये भारतीय संघासाठी रविचंद्रन आश्विन उपयुक्त ठरु शकतो असं मत व्यक्त केलं आहे. कोणत्याही परिस्थितीत सामना फिरवण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे.
(Advertise)

आश्विनने दिल्ली संघाचं प्रतिनिधीत्व केलं. युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव या दोन फिरकीपटूंच्या आगमनानंतर आश्विनला टी-२० आणि वन-डे क्रिकेटमध्ये संधी मिळत नाहीये. परंतू दिल्लीकडून खेळत असताना आश्विनने तेराव्या हंगामात महत्वपूर्ण कामगिरी केली.
(Advertise)

दिल्लीच्या संघाचा सहायक प्रशिक्षक मोहम्मद कैफने आश्विनच्या आयपीएलमधील कामगिरीचं कौतुक केलं आहे. पॉवरप्लेमध्ये महत्वाचे बळी घेणारा आश्विन भारतीय संघासाठी उपयुक्त ठरेल असं ट्विट कैफने केलं आहे.


Post a Comment

0 Comments