सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने रयत शिक्षण संस्थेला सुवर्णसंधी -प्रा. तुकाराम दरेकर


 पुणे विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक दिनांक १ डिसेंबर २०२० रोजी होत असून, या निवडणुकीसाठी रयत शिक्षण संस्थेतील उपशिक्षक आणि शिक्षक चळवळीतील धडाडीचे कार्यकर्ते श्री.नंदकिशोर बबनराव गायकवाड हे निवडणूक लढवीत आहेत. रयत शिक्षण संस्थेच्या  सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने संस्थेतील एका सेवकाला शिक्षक आमदार करण्याची सुवर्णसंधी चालून आलेली आहे. ४२ वर्षापूर्वी म्हणजे १९७८ साली पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातून रयत शिक्षण संस्थेने प्रा. एन. डी. पाटील यांना निवडून दिले होते. शिक्षक आमदार झाल्यावर सन १९७८ ते १९८० या कालावधीत  शरदचंद्रजी पवार यांच्या मंत्रीमंडळात ते सहकार मंत्री झाले होते.
(Advertise)

नंदकिशोर गायकवाड यांना महाराष्ट्र महाराष्ट्र माध्यमिक डी. एड. शिक्षक महासंघ या राज्य संघटनेने अधिकृत उमेदवारी दिलेली आहे. ते रयत सेवक मित्रमंडळाचे सरचिटणीसही आहेत. त्यांना सर्व सेवकांनी साथ देऊन शिक्षकांचे प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यावी.

नंदकिशोर गायकवाड यांना प्रथम पसंतीचे मत देऊन त्यांना प्रचंड मतांनी विजयी करावे. ज्या मतदारांना इतर उमेदवारांशी असणाऱ्या जवळच्या संबंधामुळे प्रथम पसंतीचे मत देणे शक्य नसेल तर त्यांनी नंदकिशोर गायकवाड यांना २ क्रमांकाचा पसंतीक्रम द्यावा. अशीही मतदारांना नम्र विनंती आहे. त्यांचा मतपत्रिकेवर  अनुक्रमांक १६ आहे.

Post a Comment

0 Comments