"मोदी सरकारने जवानांनाच शेतकऱ्यांच्या विरोधात उभं केलं"- राहुल गांधी


कृषी विषयक कायदे करुन मोदी सरकारने शेतकऱ्यांना वेठीला धरलं आहेच. शिवाय आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अहंकारामुळे त्यांनी जवानांनाच शेतकऱ्यांच्या विरोधात उभं केलं आहे अशी टीका काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. एक फोटो ट्विटरवर शेअर करत राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.
(Advertise)

मोदी सरकारने शेतकऱ्यांविरोधात केलेल्या खोट्या एफआयआरमुळे शेतकऱ्यांचं धैर्य खचणार नाही हे लक्षात असू द्या असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. अन्यायाविरोधात आवाज उठवणं हा अपराध नाही तर कर्तव्य आहे असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

Post a Comment

0 Comments