कर्नाटक मुख्यमंत्रीच्या राजकीय सचिवाने केला आत्महत्येचा प्रयत्न


कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांचे राजकीय सचिव आणि नातेवाईक एन.आर.संतोष यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. 

डॉलर्स कॉलनी येथील निवासस्थानी संतोष बेशुद्ध अवस्थेत आढळल्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. आधीच्या हिस्ट्रीनुसार झोप व्यवस्थित होत नसल्यामुळे संतोष कधीकधी झोपेच्या गोळया सुद्धा घ्यायचा.एक-दोन दिवसात त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल असे रुग्णालयाकडून सांगण्यात आले. पीटीआयने हे वृत्त दिले आहे.
(Advertise)

मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी स्वत: रुग्णालयात येऊन संतोषच्या प्रकृतीची विचारपूस केली. पोलिसांनी पत्नी जान्हवीची जबानी नोंदवली. पत्रकारांशी बोलताना वैवाहिक जीवनात कुठलाही वाद नसल्याचे पत्नीने सांगितले. कुठलीतरी राजकीय घटना संतोषच्या मनाला लागली होती, असे तिने सांगितले.

Post a Comment

0 Comments