चंद्रकांत पाटलांचा जन्म हिमालयात जाण्यासाठी झाला आहे - ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ


कोल्हापुरातील एखाद्या आमदाराने राजीनामा देऊन निवडणूक लढवली तेथून मी निवडून येऊन दाखवेल. निवडून नाही आलो तर हिमालयात जाईल. या चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी उत्तर दिलं आहे. 

(Advertise)

ते एका खाजगी वाहिनीच्या कार्यक्रमात बोलत होते . ते म्हणाले कोल्हापुरात भाजपचा एकही आमदार नाही, त्यामुळे कुणी राजीनामा द्यायचा प्रश्न नाही. आम्ही तीन पक्ष एकत्र आहोत, त्यामुळे त्यांनी येथून निवडणूक लढवली तर त्यांचा डिपॉझिट जप्त होईल असाही टोला लगावला.
(Advertise)

मी शरद पवारांवर पीएचडी करतोय या चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरही त्यांनी भाष्य केलं. हसन मुश्रीफ म्हणाले की, शरद पवार देशाचे आणि राज्याचे ज्येष्ठ नेते आहेत. ५० वर्षांहून अधिक त्यांचा राजकीय प्रवास आहे. देशातील आणि राज्यातील असा एकही प्रश्न नसेल जो त्यांना माहित नाही. त्यांनी उभी हयात जनतेच्या हितासाठी, विकासासाठी घालवली आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील जर पवार साहेबांवर पीएचडी करत असतील तर आम्हाला आनंदच आहे.


Post a Comment

0 Comments